शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
5
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
6
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
7
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
8
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
9
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
10
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
11
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
12
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
13
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
15
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
16
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
17
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
18
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
19
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
20
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

धरणगाव येथे पंचकल्याणक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:17 IST

चांगले पीक यावे म्हणून शेतकरी शेतात बिजारोपण करण्यापूर्वी शेतीची मशागत करुन भूूमीवर संस्कार करतो. त्याचप्रमाणे नवा जीव जन्माला घालण्यापूर्वी गर्भावर संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुनींश्री अक्षयसागरजी जी महाराज यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देगर्भसंस्कारांनी अंतिम निर्वाण सुकर होते : मुनिश्री अक्षयसागरजी महाराजपंचकल्याणक महोत्सवात गर्भकल्याणक पूर्वार्ध महोत्सवभाविकांची मोठी उपस्थिती

धरणगाव, जि.जळगाव : चांगले पीक यावे म्हणून शेतकरी शेतात बिजारोपण करण्यापूर्वी शेतीची मशागत करुन भूूमीवर संस्कार करतो. त्याचप्रमाणे नवा जीव जन्माला घालण्यापूर्वी गर्भावर संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुनींश्री अक्षयसागरजी जी महाराज यांनी व्यक्त केले. श्री १००८ आदिनाथ दिगंबर पंचकल्याणक महोत्सवाच्या गर्भकल्याणक पूर्वार्धात ते बोलत होते. गर्भसंस्कार चांगले असतील तर अंतीम निर्वाण सुकर होते, असे ते म्हणाले.संस्कार म्हणजे परीशोधन आहे. ज्याप्रमाणे एखाद्या पात्राचा उपयोग करण्यापूर्वी त्यास विसळणे, स्वच्छ करणे आवश्यक असते, तसेच जीव जन्माला येण्यापूर्वी गर्भसंस्कार आवश्यक असतात, असे ते म्हणाले. यापूर्वी मुनींश्री समताभूषणजी महाराज यांनी प्रबोधन केले. जीवनातील पुण्यकमार्चे महत्त्व विशद केले. आधुनिकतेच्या मागे लागल्याने नव्या पिढीत भक्ती आणि श्रध्देला ओहटी लागली आहे, असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली. पुण्यधर्मफल जास्त असेल तर महातीर्थकरांचीही प्राप्ती होते. आवश्यकतेपेक्षा जास्त धनाची प्राप्ती करु नका, कारण ते पापकर्म केल्याशिवाय येत नाही, जे व्यक्तीच्या पतनाला कारणीभूत ठरते, असा इशारा त्यांनी उपस्थितांना दिला.मंगळवारी प्रात:काळी नित्यपूजा, अभिषेक व शांतीधारा, इंद्रप्रतिष्ठा सकलीकरण झाले. त्यानंतर मुनींश्रींचे प्रवचन होऊन इंद्रप्रतिष्ठा, याग मंडळ विधान, मंगल कलशाची स्थापना करण्यात आली.दुपारच्या सत्रात जशी करणी तसे फळ ही नाटिका सादर करण्यात आली. गर्भसंस्कारावर मुनींश्रींचे प्रवचन झाले. सायंकाळी संगीतमय आरती, शास्त्र प्रवचन होऊन रात्री सौधर्म इंद्र सभा, तत्व चर्चा, इंद्रासन कंपायमान, अयोध्येची रचना, अष्टकुमारीद्वारा मातेची सेवा, सोळा स्वप्नदर्शन, गर्भकल्याणक आंतरिक क्रिया आदी कार्यक्रम झाले. सूत्रसंचालन मोहन जैन यांनी केले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमDharangaonधरणगाव