तळेगाव येथे पालखी व दिंडी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:05+5:302021-07-22T04:12:05+5:30

जि. प. सदस्य अतुल देशमुख यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. गावातील सर्व ज्येष्ठ भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक, ...

Palkhi and Dindi ceremony at Talegaon | तळेगाव येथे पालखी व दिंडी सोहळा

तळेगाव येथे पालखी व दिंडी सोहळा

जि. प. सदस्य अतुल देशमुख यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. गावातील सर्व ज्येष्ठ भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक, बालभजनी तसेच तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ भजनी मंडळ या सर्वांना फेटे बांधून सत्कार केला.

कोरोना महामारीत संपूर्ण जगावर आलेले संकट पांडुरंग लवकर दूर करो, सर्वांना सुखसमृद्धी प्राप्त होवो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ भजनी मंडळाचे भागवत नाना सोनार, बाबू मिस्तरी, पंडितअण्णा पाटील, सुखदेव मोरे, विठ्ठलबाबा मोरे, शिवाजीराव देशमुख, उत्तमराव शेलार, वसंत गोरे, भिकन गुंजाळ, नितीन वाघ, योगेश कासार, कल्याणराव देशमुख, सुदाम गोरे, विठोबा सुळ, राजेंद्र देशमुख, सुनील जोशी, अशोक शितोळे, ऋषी देशमुख, पवन गुरव, बालकिर्तनकार साई कासार, अंशू पवार, सार्थक उगले, युवराज मोरे आदी उपस्थित होते.

210721\21jal_8_21072021_12.jpg

चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे गावातून दिंडीची पालखी दर्शन घेताना नागरिक.

Web Title: Palkhi and Dindi ceremony at Talegaon