शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

आवक घटल्याने पालेभाज्या कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:22 IST

मेथी जुडी २५ रुपयांवर : वांग्याचे भाव तीन पटीने वाढले, कोथंबिर ९० रुपये किलो

जळगाव : पाऊस लांबण्यासह उन्हाच्या झळा कायम असल्याने भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून त्यांचे भाव वाढत आहे. यात पालेभाज्यांचे भाव सर्वाधिक वाढत असून मेथीची जुडी २५ रुपयांवर पोहचली आहे. वांग्याचे भाव तर जवळपास तीनपटीने वाढले असून कारले, गिलके, लिंबूदेखील ‘भाव’ खात आहेत. दुसरीकडे टमाट्याचे भाव मात्र कमी झाले आहेत.गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांवर त्याचा परिणाम झाला असून कडधान्याची आवक घटल्याने त्यांचेही भाव वाढत गेले. त्यात यंदाही जून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असला तरी पाऊस नसल्याने व उन्हाच्या झळा कायम असल्याने भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होत आहे.मेथीची भाजी ७० ते ८० रुपयांवरपालेभाज्यांमध्ये सर्वाधिक भाव मेथीच्या भाजीचे असून कृषी उत्पन्न बाजात समितीमध्ये गेल्या आठवड्यात ४००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या मेथीचे भाव या आठवड्यात ४ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहेत. किरकोळ बाजारात तर मेथी ७० ते ८० रुपये प्रती किलोने विक्री होत असून जुडीचे भाव २५ रुपयांवर पोहचले आहेत. या सोबतच पोकळ््याचे भाव दीडपटीने वाढले असून बाजात समितीमध्ये गेल्या आठवड्यात १२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या पोकळ््याचे भाव या आठवड्यात १८०० रुपयांवर पोहचले आहेत. किरकोळ बाजारात पोकळा ४० ते ४५ रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. या शिवाय पालकचेही भाव दीडपटीच्यावर वाढले असून १५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या पालकचे भाव या आठवड्यात २५०० रुपयांवर गेले.वांगे तीन पटीने महागलेलग्न सराईमुळे मागणी वाढल्याने वांग्याचे भाव वाढतच असून या आठवड्यात तर वांगे तीन पटीने महागले आहेत. गेल्या आठवड्यात बाजार समितीमध्ये ५०० ते १००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या वांग्याचे भाव या आठवड्यात १५०० ते ३००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. किरकोळ बाजारात वांगे ५० ते ७० रुपये प्रती किलोवर पोहचले आहेत.कारल्यासोबत गवारही झाली ‘कडू’- कारले १००० ते ३००० रुपये प्रती क्विंटलवरून १५०० ते ३५०० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. अशाच प्रकारे बाजार समितीमध्ये भेंडी १४०० ते ३२०० रुपये प्रती क्विंटलवरून १७०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी - १००० ते २००० रुपये प्रती क्विंटलवरून १३०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल, गवार - ३००० रुपये प्रती क्विंटलवरून ४००० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ४०० ते १००० रुपये प्रती क्विंटलवरून ८०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, गिलके १५०० ते ३००० रुपये प्रती क्विंटलवरून २००० ते ३५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.- टमाट्याचे होलसेल भाव मात्र १५०० ते ३००० रुपये प्रती क्विंटलवरून १५०० ते २५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत तर हिरवी मिरची २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे.- दैनंदिन वापरात येणारी कोथिंबीरही महागली आहे. गेल्या आठवड्यात बाजार समितीमध्ये २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटलने खरेदी झालेली कोथिंबीर या आठवड्यात थेट २५०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.- कोथिंबीरच्या दर्जानुसार किरकोळ बाजारात हे भाव ८० ते ९० रुपये प्रती किलोवर पोहचले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव