शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान पण सांगेल शिवसेना कोणाची?, ठाकरेंचा पुन्हा एकदा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 11:29 IST

‘तुम्ही चोरलेला धनुष्यबाण वापरा’

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भाजपकडे स्वतःचा नेता नाही. म्हणून ते दुसऱ्यांचे नेते चोरून मतं मागतात. भाजपने जाहीर करावं, येत्या निवडणुका ते मिंधे गटाच्या नेतृत्वात लढणार आहेत का? मी आव्हान देतो तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण आणि मोदींचा चेहेरा घेऊन या. मी माझं नाव घेऊन येतो. बघूया महाराष्ट्र कोणाला निवडून देतो, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटाला आव्हान दिले आहे.

रविवारी पाचोरा येथे माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यात लवकरच निवडणुका लागतील. त्यामुळे ज्या गद्दारांना शिवसेनेने घोड्यावर बसविले त्यांना आता खाली खेचायची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आगामी निवडणुक ही मिंधे गटाच्या नेतृत्वात लढणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. पावसाळ्यात नाही तर आताच निवडणुका होऊन जाऊ द्या. आमच्या मशालीच्या ज्वालांनी तुमचे सिंहासन जाळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी मी फकीर आहे, असे सांगत आहेत. त्यांच्या मागे पुढे कुणी नाही. ते कधीतरी झोळी लटकवून निघून जाणार, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन जातील, मग जनतेने काय करायचे, असा सवालही त्यांनी केला.

निवडणूक आयोगावर टीकाठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांनी प्रतिसाद दिल्यानंतर, शिवसेना कोणाची हे स्पष्ट होत असल्याचे सांगितले. ही जनतेचे समर्थन पाहून पाकिस्तानदेखील सांगणार की शिवसेना कोणाची? मात्र मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला कळले नाही , असे सांगत ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे