भादलीत एड्सवर चित्रकला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:41+5:302021-02-05T05:53:41+5:30

जळगाव : भादली बुद्रुक गावातील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयामध्ये १४ वर्षांवरील वयोगटांतील मुलांमध्ये एचआयव्ही एड्सबद्दल जनजागृती करण्यात आली. ...

Painting competition on Bhadali Aids | भादलीत एड्सवर चित्रकला स्पर्धा

भादलीत एड्सवर चित्रकला स्पर्धा

जळगाव : भादली बुद्रुक गावातील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयामध्ये १४ वर्षांवरील वयोगटांतील मुलांमध्ये एचआयव्ही एड्सबद्दल जनजागृती करण्यात आली. नेहरू युवा केंद्र, जळगाव आणि जिंदगी फाैंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भादली गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अंजली पाटील यांनी केले. जिंदगी फाैंडेशनचे सचिव अजय पाटील यांनी एचआईव्हीबद्दल उपस्थित मुलांना माहिती सांगितली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जळगाव आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी अनिरुद्ध कांबळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अजय सोनवणे याने, द्वितीय क्रमांक लिताली अत्तरदे तर तृतीय क्रमांक तनुजा चौधरी हिने पटकावला.

या कार्यक्रमाला जिंदगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव, सदस्य विशाल बोदडे, शाळेचे मुख्याध्यापक आर. के. तायडे, आर. पी. अत्तरदे तसेच लिंकवर्कर उषा कोळी आणि कल्पना वाणी उपस्थित होत्या.

Web Title: Painting competition on Bhadali Aids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.