पहूर येथे ५९ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST2021-07-08T04:13:12+5:302021-07-08T04:13:12+5:30
लोकमत, पेठ ग्रुपग्रामपंचायत, कसबे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान अभियानाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शेतकी ...

पहूर येथे ५९ जणांनी केले रक्तदान
लोकमत, पेठ ग्रुपग्रामपंचायत, कसबे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान अभियानाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख होते. प्रगतीशील शेतकरी अशोक पंढरीनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, बाजार समिती सभापती संजय देशमुख, उपसरपंच श्यामराव सावळे,पेठ विकासो चेअरमन किरण खैरनार, लेले विद्यालयाचे लिपिक किशोर किसनराव पाटील, तलाठी सुनील राठोड, ग्रामविकास अधिकारी डी.पी. टेमकर, किशोर तुकाराम
पाटील, पोलीस कर्मचारी जितेंद्र परदेशी यांनी रक्तदान केले.
यावेळी सरपंच नीता रामेश्वर पाटील, जि.प. सदस्य अमित देशमुख, उपसरपंच श्यामराव सावळे, माजी सरपंच शंकर जाधव, उपसरपंच कसबे राजू जाधव, मुख्याध्यापक आर.बी. पाटील, सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, ॲड. एस.आर.पाटील, जि.प.चे माजी सभापती प्रदीप लोढा, जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, माजी सभापती बाबुराव घोंगडे, हेमंत जोशी, लक्ष्मण गोरे, शांताराम लाठे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, ललित लोढा, युसूफ बाबा, समाधान पाटील, योगेश भडांगे, शरद पांढरे, वासुदेव घोंगडे, नयन जोशी, शिवाजी राऊत, सलीम शेख गणी,गणेश पांढरे, संदीप बेढे, ईश्वर देशमुख, चेतन रोकडे, शरद बेलपत्रे, विनोद थोरात, शांताराम गोंधनखेडे, दत्तू जाधव, एका पहेलवान, गणेश मंडलिक,संजय तायडे, प्रकाश पाटील, भारत पाटील,रवींद्र पांढरे,शाकीर शेख,तौफिक तडवी,अशोक सुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यासाठी रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, एकलव्य भिल्ल तडवी परिषदेचे तालुकाध्यक्ष अब्बु तडवी, उपसरपंच राजू जाधव, सामाजिक कार्यकर्ते महेश पांढरे, राहुल ढेंगाळे,उमेश जोशी लोंढ्री,चेतन रोकडे, अमोल दौंगे, आशीष भिवसने आदींनी परिश्रम घेतले. रेडक्रास सोसायटीचे डॉ. पी.बी. जैन,साहाय्यक तंत्रज्ञ, प्रयोगशाळा साहाय्यक सीमा शिंदे,सतीश मराठे, मंगल ओतारे यांनी सेवा पुरविली. सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी तर आभार मनोज जोशी यांनी मानले.
चौकट
पारोळा येथे आज रक्तदान शिबिर
पारोळा : लोकमत,शिवछावा संघटना, साईबाबा अल्पसंख्याक समाज विकास संस्था व अमृत ग्रुप यांच्यावतीने गुरुवार ८ रोजी सकाळी ९ ते ३ वाजेदरम्यान पारोळा येथे रक्तदान शिबिर होईल. पीपल्स बँकेशेजारील सोनार मंगल कार्यालयात होणाऱ्या या शिबिरास उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
फोटो ओळ : १) अमळनेर येथे रक्तदान करताना आमदार अनिल पाटील.
२) रक्तदान केल्यानंतर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस नाईक शरद पाटील यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सोबत संजय पाटील व डिगंबर महाले.
३) पहूर, ता. जामनेर येथे आयोजित शिबिरात रक्तदान करताना स्वप्नील नाईक. सोबत नीता पाटील, रामेश्वर पाटील यांच्यासह पदाधिकारी.