आडगावला पावणेदोन लाखाची घरफोडी

By Admin | Updated: July 2, 2017 10:34 IST2017-07-02T10:34:19+5:302017-07-02T10:34:19+5:30

आडगाव येथील शंभुराजे लोटू सैंदाणे यांच्या बंद घरातून चोरटय़ांनी पावणेदोन लाखाचा ऐवज लांबविला.

Pagodon Lakhachi burglar at Adgah | आडगावला पावणेदोन लाखाची घरफोडी

आडगावला पावणेदोन लाखाची घरफोडी

 ऑनलाईन लोकमत 

यावल, दि.2 - तालुक्यातील आडगाव येथील शंभुराजे लोटू सैंदाणे यांच्या बंद घरातून चोरटय़ांनी  पावणेदोन लाखाचा ऐवज लांबविला. 
घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज वाकवून दरवाजा उघडून चोरटे घरात शिरले. त्यांनी घरातील एक लाख 23 हजार रुपये रोख रकमेसह 54 हजार रुपये किमतीचे 23 ग्रॅम सोने लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 1 च्यादरम्यान घडली.
भरदिवसा झालेल्या या घरफोडीने परिसरातील शेतकरी भयभीत  झाले  आहेत. अज्ञात चोरटय़ांविरुद्ध  येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी शंभुराजे लोटू सैंदाणे  घरच्यांसोबत शुक्रवारी सकाळी शेतात गेले असता, त्यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज वाकवून मागील बाजूचा दरवाजा उघडत अज्ञात चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून कपाटातील एक लाख 23 हजार रुपये रोख व सोन्याची पोत, अंगठी, कानातील टोंगल,  बाह्या असे 23 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एक लाख 77 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 

Web Title: Pagodon Lakhachi burglar at Adgah