पिलखोड, ता. चाळीसगाव : सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी नारायण भिका मगर (वय ८५) यांचे निधन झाल्यानंतर, १२ तासातच त्यांच्या पत्नी कावेरीबाई नारायण मगर (वय ७७) यांचेही निधन झाले. ...
दस:यासह लागोपाठ आलेल्या सुटय़ांची संधी साधून चोरटय़ांनी आपल्या गावी गेलेल्या अमळनेरातील प्रताप मील कंपाऊंडमधील रहिवाशांच्या बंद सहा घरांना लक्ष्य करीत रोख रकमेसह सोन्या- चांदीचे दागिने लंपास केल्याने या रहिवाशांना दसरा ‘हसरा’ न वाटता ‘दुखरा’ वाटला आहे. ...
चोपडा येथे श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या वहनोत्सवानिमित्त रविवारी बालाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. तसेच धरणगाव आणि पारोळा येथेही बालाजींच्या रथोत्सवाला प्रारंभ झाला असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. ...
डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात २ आॅक्टोबर रोजी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. सकाळी ७ वाजेपासून सेवेकरी अभियानाला सुरुवात करणार आहेत. ...