ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कुटुंबातून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे गृहीत धरुन धावत्या रेल्वेखाली तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही मृतदेहाची सोमवारी रात्री उशिरा ओळख पटली. इंद्रदत्त रमेश गोडबोले (वय २२) व रुपाली माणिक पवार (वय २०) दोन्ही रा.मेहरुण तलाव ...
चारित्र्यावर संशय घेऊन अशरफ मोईद्दीन तडवी याने पत्नी छोटीबाई हिच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता तालुक्यातील उजाड कुसुंबा येथे घडली. या घटनेत छोटीबाई ७५ टक्के जळाली असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पती अशरफ याला ...