जिल्हा दूध संघाच्या आवारातील जिल्हा बॅँकेच्या शाखेत चोरट्यांनी प्रवेश करीत दगडांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात चोरट्यांना तिजोरीचे फक्त हँडल तोडण्यात यश आले,तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने त्यातील साडे पाच लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिल ...
शिंदखेड्याचे जयकुमार रावल व जामनेरचे गिरीश महाजन यांनी नियोजनपूर्वक मतदारसंघ जोडला आहे. पाच दिवसात ५२ कि.मी.ची परिक्रमा असो की, लेझीम घेऊन मिरवणुकीत नृत्य असो हे दोन्ही नेते जनतेशी नाळ जोडून ठेवतात. हेच यशाचे गमक आहे. ...
लहानपणापासून मोबाइल, टिव्हीमध्ये गुंतून असलेली मुले असे एकिकडे चित्र असताना जळगावात मात्र झोपडपट्टीतील मुलांना दररोज संस्काराचे धडे देण्यासह देशभक्तीची ज्योत जागविण्याचे काम संस्कार केंद्रामार्फत केले जात आहे. ...
ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या गारपिटीमुळे मुगाच्या पिकाला फटका बसून उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारपेठेत मूगडाळीची आवक घटल्याने भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढून ७,००० ते ७,३०० रुपये झाली आहे. ...
रिक्षाने कट मारल्यामुळे रस्त्यावर दुचाकीसह कोसळल्याने मागून भरधाव वेगाने आलेला ट्रक अंगावरुन गेल्याने मयुर सुनील दिवेकर (वय २८ रा. शनी पेठ, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजता राष्टÑीय महामार्गावर शिव कॉलनी पुलाजवळ घडली. ...
वाघनगर परीसरात कुल्फी कारखान्या समोरील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद पाटील (३६) या तरूणाने रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊ दरम्यान राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...