गिरणा नदीच्या पात्रात वाळू माफियांनी शनिवारी सकाळी हैदोस घालत मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातले तर वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण करून त्याच्या गळ्यातील ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लुटून नेला. ...
चाळीसगाव शिक्षण संस्थेने एक पाऊल पुढे टाकून हे वनस्पती उद्यान (बॉटॅनिकल गार्डन) उभे करून चाळीसगावच्या वैभवात भर घालतानाच नवी ओळखही अधोरेखित केली आहे. ...
विद्यार्थिनीला अश्लिल चित्रफीत दाखविणाऱ्या नगर पालिकेच्या शिक्षण सभापतीला अटक करण्याची मागणी करीत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जोडेमार आंदोलन केले. ...
भुसावळ तालुक्यातील शिरपूर-कन्हाळा शिवारात गावठी दारू हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी २ हजार ८३४ लीटर दारू उद्ध्वस्त केली व एका आरोपीस अटक केली आहे, ...
पहूर ता. जामनेर : पहूर पेठ, कसबे येथे पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण होऊ घातली असून यावर उपाययोजना करण्यासाठी सरपंचांनी तहसीलदारांना निवेदन दिली आहेत. तथापि तालुका प्रशासन निद्रीस्त अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...
यावल तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामविकास अधिकारी संजय तुळशीराम भारंबे यांना शुक्रवारी मुंबईत राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
कुºहा परिसरातील जोंधनखेडा येथील एक व मलकापूर तालुक्यातून चोरी गेलेल्या सहा अशा एकूण सात मोटारसायकली कुºहा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या चोरीप्रकरणी येथून जवळच असलेल्या धामणगाव येथील एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. ...
पूर्णाड येथील प्रादेशिक परिवहन तपासणी नाक्यावर अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणाºया चोरट्या वाहतुकीविरोधात शनिवारी सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी परिवहन अधिकाºयांनी तपासणी नाक्यावर ...