तीन महिन्यांपूर्वी नाला-सोपारा बाँबस्फोटप्रकरणी तर आता आधुनिक विचारसरणीचे ज्येष्ठ नेते अॅड़ गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने यावल तालुक्यातील साकळी येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास अटक केल्याचे ‘लोकमत’ वाचताच साकळीसह तालुक्यात खळबळ उडाली ...
भुसावळ येथील सिंधी समाज बांधवांतर्फे सिंधी कॉलनीतील झुलेलाल मंदिरात बैठक झाली. त्यात लग्नकार्यामध्ये पारंपरिकऐवजी फक्त मोजके मेनू राहतील. यामुळे अवाजवी खर्च व अन्नाची बचत होईल, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ...
वाकडी ता.जामनेर येथील विवाहिता मयत कविता ज्ञानेश्वर खडसे (घुगे) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरूद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...
युती सरकारने मराठा आरक्षण सवार्नुमते जाहीर केले तसेच धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करुन प्रयत्न केल्यामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा रविवारी सर्व पक्षीय सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ...
मुक्ताईनगर तालुका कुंभार समाज संघटनेतर्फे राज्यस्तरीय कुंभार समाजाचा मेळावा तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाजातील पुरस्कारार्थी मान्यवरांचा गौरव सोहळा रविवारी येथील सुराणानगर परिसरात आयोजित भव्य कार्यक्रमात पार पडला. ...
भुसावळ तालुक्यातील खडका गावातील अनिल वारके यांची आई भुसावळला बाजार करण्यासाठी आली असता त्या महिलेचा मोबाइल व पर्स हरविल्याची घटना सकाळी घडली. यानंतर पोलीस कर्मचारी तस्लीम पठाण यांच्या जागरुकतेमुळे ते संबंधितांना परत मिळाले. ...