पहूर येथील कसबे भागातील रहिवासी तथा रिक्षाचालक विजय रामदास थोरात (४७) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. त्याच्यावर खासगी वित्तसंस्थेचे कर्ज होते. या विवंचनेतून त्याचे आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. ...
खान्देशचे राजकारण दोन ‘भाऊं’वर केंद्रित आहे. पहिले नाथाभाऊ अर्थात एकनाथराव खडसे आणि दुसरे गिरीशभाऊ अर्थात गिरीश महाजन. नाथाभाऊंच्या वलयातून बाहेर पडल्यावर आणि मुख्यमंत्र्यांची छत्रछाया लाभल्यावर गिरीशभाऊ विक्रमांची बरसात करीत आहे. ...
इंग्रजी भाषेला आलेल्या आंत्यतिक महत्त्वामुळे प्रादेशिक भाषा आणि बोलीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी मराठी भाषा सक्तीची केली गेली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक गो.तु.पाटील यांनी व्यक्त केले. ...
मोठ्या संमेलनाबरोबर ग्रामीण भागात अशी छोट्या-छोट्या स्वरुपाची साहित्य संमेलने भरविणे ही काळाची गरज आहे, अशा संमेलनातून सांस्कृतिक आणि साहित्यिक मेजवानी मिळाली असल्याची भावना या साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या साहित्यप्रेमी, वाचकांनी व्यक्त केली. ...
पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते. ...
राज्यातील साडेबारा हजारांपैकी साडेसात हजार सार्वजनिक ग्रंथालये शासकीय अनुदानाअभावी बंद पडली. जी ग्रंथालये सुरू आहेत ती तुटपुंज्या अनुदानावर कशी जगतील हा प्रश्न आहे. शासनाने ग्रंथालयाप्रमाणेच शेतकºयांचे दु:ख समजून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, ...
१० वर्षानंतर यावर्षी प्रथमच बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरल्याने रविवारी उत्पादीत झालेल्या यंदाच्या गाळप हंगामातील साखरेचे पूजन अंबाजी ग्रुपचे संचालक व उद्योगपती प्रवीण पटेल यांच्याहस्ते झाले. यावेळी एकमेकांना साखर भरवून हा सोहळा साजरा झाला. ...