पाडसे येथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST2021-07-25T04:16:18+5:302021-07-25T04:16:18+5:30
अमळनेर : घरात घुसून महिलेचा विनयभंग करून दोन दिवसांनी पुन्हा महिलेच्या पतीशी व दिराशी वाद घालणाऱ्या पाडसे येथील एकाविरुद्ध ...

पाडसे येथे
अमळनेर : घरात घुसून महिलेचा विनयभंग करून दोन दिवसांनी पुन्हा महिलेच्या पतीशी व दिराशी वाद घालणाऱ्या पाडसे येथील एकाविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
२२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक महिला घरात एकटी असताना अरुण श्रावण गव्हाणे याने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. महिलेने बाहेर येऊन आरोळ्या मारताच पळून गेला. महिलेने पती, सासू, शेतमालक यांना घटना सांगून वाद आपसात मिटले होते. मात्र गव्हाणे याने पुन्हा दोन दिवसांनी २४ रोजी महिलेचा पती व दिराशी वाद घातला. महिलेने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास हेकॉ. भास्कर चव्हाण करीत आहेत.