पाचोऱ्यात गावठी कट्ट्यासह दोन जण पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:13+5:302021-07-24T04:12:13+5:30
सुरज नारायण शिंदे (३५, रा. कृष्णापुरी, पाचोरा) व अशोक बाबूलाल पवार अशोक बाबूलाल पवार (२८, रा. सारोळा बुद्रूक, ता. ...

पाचोऱ्यात गावठी कट्ट्यासह दोन जण पोलिसांच्या जाळ्यात
सुरज नारायण शिंदे (३५, रा. कृष्णापुरी, पाचोरा) व अशोक बाबूलाल पवार अशोक बाबूलाल पवार (२८, रा. सारोळा बुद्रूक, ता. पाचोरा) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पाचोरा-सारोळा रस्त्यावर दोघेजण हातात कट्टा घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाळे यांना मिळाली. त्यानुसार हे.कॉ. उमेशगीर गोसावी, विलास पाटील, हरीश परदेशी यांच्या पथकाने सापळा रचला.
पाचोरा-सारोळा रस्त्यावर मोटारसायकलवर आलेल्या सूरज शिंदे याच्या कमरेला कट्टा लावलेला व खिशात १ जिवंत काडतूस आढळले. तर त्याच्या सोबत असलेला अशोक पवार यास रात्री उशिरा अटक करण्यात आली. याबाबत रात्री उशिरा पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.