पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:18+5:302021-07-15T04:13:18+5:30

पाचोरा भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आणि गटनेते ...

Pachora NCP observers held a review meeting | पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक

पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक

पाचोरा भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आणि गटनेते संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, मनीष जैन, जिल्हा प्रतिनिधी उमेश नेमाडे, युवानेते योगेश देसले, नामदेव चौधरी, संजय पवार, राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पाचोरा भडगाव मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत प्रचंड आर्थिक उलाढाल झाली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनपेक्षित अपयश स्वीकारावे लागले आहे. तरुणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असल्याची भावना असल्यामुळे मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणी होत आहे.

निरीक्षक अविनाश आदिक यांनी राजकीय बदलांचा चांगला फायदा घेतला जाऊ शकतो आणि संघटन मजबूत करण्यासाठीदेखील प्रयत्न केले जाऊ शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनीदेखील उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष संतोष जाधव, पाचोरा शहर अध्यक्ष अजहर खान, भडगाव शहराध्यक्ष श्याम भोसले, भडगाव कार्याध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, सुदर्शन सोनवणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शालिग्राम मालकर, सतीश चौधरी, अविनाश सुतार, नगरसेवक बशीर बागवान, सीताराम पाटील, प्रा. भागवत महालपुरे, रणजित पाटील, प्रकाश पाटील, नितीन तावडे, वासुदेव महाजन उपस्थित होते.

Web Title: Pachora NCP observers held a review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.