पाचोरा येथील नगराध्यक्ष संजय गोहील अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 14:26 IST2019-01-24T14:25:48+5:302019-01-24T14:26:13+5:30
मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही.

पाचोरा येथील नगराध्यक्ष संजय गोहील अपात्र
जळगाव- मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने पाचोरा येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील (शिवसेना) यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.
पाचोरा नगरपालिकेची निवडणूक ११ नोव्हेंबर २०१६ मध्ये झाली होती. यात नगराध्यक्षपदी शिवसेनेचे संजय गोहील हे अनसूचित जाती संवर्गातून निवडून आले होते. यानंतर सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना पदावरुन अपात्र करावे, असा अर्ज पराभूत उमेदवार अजय भास्कर अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी जिल्हाधिकाºयांकडे केला होता.
त्यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी हा निकाल देत गोहील यांना अपात्र घोषित केले.