पाचोरा न्यायालयाने दिला वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:26+5:302021-07-03T04:11:26+5:30
लोकमत न्यूज नेटर्वक खडकदेवळा, ता पाचोरा : पाचोरा दिवाणी न्यायालयाच्या आवारात शुक्रवारी २ जुलै रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात ...

पाचोरा न्यायालयाने दिला वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश
लोकमत न्यूज नेटर्वक
खडकदेवळा, ता पाचोरा : पाचोरा दिवाणी न्यायालयाच्या आवारात शुक्रवारी २ जुलै रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात झाला.
पाचोरा न्यायालयाने दिला वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश आणि वृक्षांचे संगोपनही करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, पाचोरा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एफ. के. सिद्दीकी, सह दिवाणी न्यायाधीश एल. ए. श्रीखंडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, ॲड. संजीव नैनाव, ॲड. अनुराग काटकर, ॲड. सुनील पाटील, ॲड. डी. आर. पाटील, ॲड. अनिल पाटील, ॲड. रवि राजपुत, ॲड. रोहित ब्राह्मणे, न्यायालयीन सहायक अधीक्षक ए. आर. पाटील, सविता जाधव, न्यायालयीन पैरवी अधिकारी पो. काॅ. दीपक पाटील, पो. हे. काॅ. प्रदीप पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी घेण्यात आला.
----
पाचोरा न्यायालय परिसरात न्यायाधीश ए. के. सिद्धीकी, सह न्यायाधीश एल. ए. श्रीखंडे, प्रांताधिकारी राजेंद कचरे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, वैद्यकीय अधिकारी अमित साळुंखे आदी मान्यवर उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
०३सीडीजे४