ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात ऑक्सिजन बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST2021-06-25T04:14:05+5:302021-06-25T04:14:05+5:30

जामनेर : संभाव्य तिसऱ्या लाटेत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर किमान ८ ते १० ऑक्सिजन बेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व स्थानिक ...

Oxygen beds in health centers through gram panchayats | ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात ऑक्सिजन बेड

ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात ऑक्सिजन बेड

जामनेर : संभाव्य तिसऱ्या लाटेत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर किमान ८ ते १० ऑक्सिजन बेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व स्थानिक दात्यांकडून करण्यात येणार असल्याचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय सोनवणे यांनी सांगितले.

गुरुवारी त्यांनी जामनेरला भेट दिली.

लवकरच नॉन कोविड सेवा विशेषतः कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्प सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना टेस्टिंग, कोरोना लसीकरण, क्षयरोग, कुष्ठरोग, नियमित लसीकरण, प्रसूती पश्चात सेवा व सहा राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम, डॉ.मनोज पाटील, डॉ. नरेश पाटील, डॉ. जितेंद्र जाधव, डॉ. किरण पाटील, डॉ. अमृता कोलते, डॉ. पुरुषोत्तम पाटील, तालुका आरोग्य सहाय्यक बशीर पिंजारी, तालुका मलेरिया सुपरवायझर व्ही. एच. माळी, मिलिंद लोणारी, सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक उपस्थित होते.

Web Title: Oxygen beds in health centers through gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.