हॉटेलवर धाड टाकल्याने चिडलेल्या मालकाने केले स्वत:ला जखमी

By Admin | Updated: May 11, 2017 11:08 IST2017-05-11T11:08:39+5:302017-05-11T11:08:39+5:30

भुसावळातील हॉटेल वरुण मधून केला मद्यसाठा जप्त

The owner of the hotel has hurt himself after throwing a hotel | हॉटेलवर धाड टाकल्याने चिडलेल्या मालकाने केले स्वत:ला जखमी

हॉटेलवर धाड टाकल्याने चिडलेल्या मालकाने केले स्वत:ला जखमी

 भुसावळ,दि.11 - शहराजवळील आणि आशिया महामार्गावरील हॉटेल वरुणवर सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या पथकाने अचानक छापा टाकून 8 हजार 380 रुपये किमतीचा दारुसाठा जप्त केला आहे. दरम्यान, हॉटेल वरुणचे मालक व माजी नगरसेवक शांताराम इंगळे यांनी या प्रकारामुळे स्वत:हून मारुन घेतल्याने त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत निलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पथकातील साहाय्यक फौजदार दिलीप कोळी, हवालदार प्रदीप पाटील, पोलीस नाईक सुनील शिंदे, पोलीस शिपाई  राजेश गाढे, संदीप झांबरे, विशाल सपकाळे कादर तडवी यांनी आशिया महामार्गावरील हॉटेल वरुणवर अचानक गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून 8 हजार 380 किमतीचा  59 बॉटल इतका मद्यसाठा जप्त केला आहे.
दरम्यान, या  कारवाईमुळे चिडलेले हॉटेल मालक शांताराम इंगळे स्वत:च स्वत:वर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.

Web Title: The owner of the hotel has hurt himself after throwing a hotel