ध्येयासाठी अडथळ्यांवर मात करा- सुकन्या पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 12:40 IST2017-07-03T12:40:39+5:302017-07-03T12:40:39+5:30
नोबेल फाउंडेशनतर्फे जळगावात झाला सत्कार

ध्येयासाठी अडथळ्यांवर मात करा- सुकन्या पाटील
ऑनलाईन लोकमत
जळगाव ,दि.3 - जग प्रचंड मोठे आह़े त्या मानाने माणसाचे आयुष्य खूप छोटे आह़े या छोटय़ाशा आयुष्यात काही मोठे करून दाखवायचे असेल तर वेळेचे नियोजन करायला शिका, आपल्यातील गुण ओळखले पाहिजे, ध्येय ठरविले पाहिजे, ध्येयप्राप्तीच्या प्रवासात अडथळे खूप येतील़ मात्र जिद्द, चिकाटीने सतत प्रयत्न करा, यश हमखास मिळेल, असा सल्ला आयआयटी सुवर्णपदक विजेती सुकन्या पाटील हिने विद्याथ्र्याना दिला़
नोबेल फाउंडेशनतर्फे सुकन्याच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होत़े त्या वेळी ती बोलत होती़ अध्यक्षस्थानी माजी प्राध्यापक होमसिंग पाटील, लेखक डॉ़ किरण देसले, सुकन्याचे वडील विजयसिंग पाटील, आई डॉ़ संगीता पाटील यांची उपस्थिती होती़
सुकन्या हिचा आई-वडिलांसमवेत स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ सुकन्या हिचा भाऊ अंकित हाही आयआयटीला असून त्याचाही या वेळी सत्कार करण्यात आला़ विद्यार्थिनी अवंतिका महाजन हिने सुकन्याचा परिचय करून दिला़
आयुष्यात कधी यश, तर कधी अपयश
दहावीत पहिला क्रमांक अपेक्षित असताना, माझा तिसरा क्रमांक आला़ मात्र या अपयशावर कधी रडत बसले नाही़ आई, वडील माङया पाठीशी खंबीरपणे उभे राहिल़े पुण्याला आले अन् अभ्यास केला़ आयुष्य म्हणजे खेळ, कधी यश, तर कधी अपयश मिळणारच़ अपयशानंतरच्या यशाच्या गोडीचा काही वेगळाच आनंद असतो, असेही सुकन्याने सांगितल़े आयआयटी अनेकांचे स्वप्न असते, ते पूर्ण करण्यासाठी शिकण्याचा उत्साह असला पाहिज़े
या वेळी आयआयटीसाठी निवड झालेल्या प्रथमेश बोरसेसह दहावी परीक्षेतील गुणवंत रोशन रायसिंग, अवंतिका महाजन, पंकज राठोड, हर्षल पाटील, महेश मनोरे यांचाही पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला़ सुकन्या हिचे आई व वडील यांची प्रा़रामचंद्र पाटील व वक्ते मनोज गोविंदवार यांनी मुलाखत घेतली़
सूत्रसंचालन नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील, तर आभार संचालक विशाल पाटील यांनी मानल़े