पदोन्नतीसंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:03+5:302021-07-27T04:17:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पदोन्नतीमधील आरक्षणाविषयी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तसेच अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग ...

पदोन्नतीसंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पदोन्नतीमधील आरक्षणाविषयी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तसेच अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण तत्काळ लागू करावे, या मागणीसाठी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
खान्देश प्रभारी सुमित्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाला इंडिया गॅरेजपासून सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला. तेथे विलास चिकणे, विश्वास पाटील व प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना किशोर नरवाडे, रेखा मेश्राम, वैशाली भालेराव, सुनीता लांडगे व प्रकाश इंगळे यांनी निवेदन दिले.
मोर्चामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, कास्ट्राईब संघटना (एस.टी.), बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, प्रोटान, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (आरोग्य शाखा), भारत मुक्ती बेरोजगार, बहुजन क्रांती मोर्चा, पँथर सेना, राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ, असंघटित क्षेत्र कर्मचाऱी संघ, भारतीय बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय किन्नर मोर्चा, राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या संघटना सहभागी झाल्या होत्या.