किसान महाविद्यालयात राष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:27+5:302021-08-22T04:19:27+5:30

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील, प्र-कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार, प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे, प्रा. डॉ. ...

Organizing National E-Conference at Kisan College | किसान महाविद्यालयात राष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

किसान महाविद्यालयात राष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील, प्र-कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार, प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे, प्रा. डॉ. प्रमोद पवार, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील उपस्थित होते. बीजभाषक म्हणून प्रा. डॉ. प्रकाश पवार, तर सत्राध्यक्ष म्हणून प्रा. विजय तुंटे होते.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. या ७५ वर्षांत भारतीय राष्ट्रवादाची वाटचाल कशी राहिली, त्याचे स्वरूप कसे राहिले, त्याचे गुण व दोष काय आहेत, त्याच्यासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर विचारमंथन करण्याच्या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या सत्रात विविध विभागातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी राष्ट्रवाद विषयाशी समन्वय साधणाऱ्या शोधनिबंधांचे वाचन केले.

प्रा. विजय तुंटे यांनी वाचन झालेल्या शोधनिबंधाचे विश्लेषण करून धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे महत्त्व पटवून दिले. अभिप्राय नोंदविताना प्रा. डॉ. योगेश उगले यांनी परिषदेचा आशय अतिशय प्रासंगिक असून, या विषयावर विचारमंथन होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

परिषदेचे संयोजक म्हणून उपप्राचार्य डॉ. गुणवंत सोनवणे आणि डॉ. पी. डी. पाटील यांनी काम पाहिले, तर परिषदेची भूमिका समन्वयक म्हणून प्रा. शशिकांत पाटील यांनी मांडली. समारोपीय भाषण प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील, तर डॉ. बी. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एम. एम. बागले व प्रा. आर. एस. माळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ए. ए. भंडारे आभार मानले.

Web Title: Organizing National E-Conference at Kisan College