शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

संघटना म्हणतात...कोरोनाचा संसर्ग वाढलाय, बाधा होईल...मोहिमेला स्थगिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:12 IST

हजारो शिक्षक व अंगणवाडी सेविका शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधार्थ

जळगाव : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविली जात आहे. नियुक्त शिक्षकांकडून प्रत्यक्ष घरोघरी फिरून माहिती गोळा केली जात आहे. मात्र, यातून शिक्षकांना कोरोना होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे ही मोहिम स्थगित करण्यात यावी, अशी मागणी आता शिक्षक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी १ ते १० मार्चपर्यंत विशेष शोध महिम राबविण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या़ त्यानुसार जळगाव जिल्ह्यात १ मार्चपासून शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधार्थ मोहिमेला सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे या मोहिमेला जळगाव जिल्ह्यात सुरूवातीपासूनचं शिक्षक संघटनांकडून विरोध दर्शविण्यात येत होता. एक ते दोन दिवसांपूर्वी सुध्दा विविध शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी यांना मोहिम स्थगित करण्यासाठी निवेदन दिले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २६ हजार शिक्षक आहे. यापैकी अर्धे शिक्षक या मोहिमेवर आहेत.बालकांचा येथे घेतला जातोय शोधजिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरात गजबजलेल्या वस्त्या-रेल्वे स्टेशन, बस स्थानक, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, झोपड्या, फुटपाथ, सिग्नल, लोककलावंतांची वस्ती आदी ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शहरातील काही भागांमध्ये अजूनही काही शिक्षकांनी भेटचं दिली नसल्याचे समजते.तालुक्यांवर झाल्या बैठकाशाळाबाह्य मुलांच्या शोधार्थ मोहिमेसाठी काही दिवसांपूर्वी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक तालुक्यावर बैठक घेवून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सकाळपासून या मोहिमेला सुरूवात होवून ६ ते १९ वयोगटातील मुलांचा शोध घेतला जात आहे.शिक्षक घेताहेत काळजीसध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. त्यात घरोघरी जावून माहिती गोळा करावी लागत आहे. परिणामी, कोरोना होण्याची भीती नाकारता येत नसल्यामुळे गुरूवारी कोरोना विषयी काळजी घेत आहे. मात्र, तरी देखील बाधा झाल्यास यास कोण जबाबदार असणार, असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.शोध मोहिमेची जबाबदारी- नोडल अधिकारी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी- पर्यवेक्षक : केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षक- प्रगणक : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडीसेविका/मदतनीस

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव