ऑनलाइन साडी मागविली; वृद्धाला ७५ हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:53+5:302021-09-05T04:20:53+5:30

जळगाव : ऑनलाइन मागविलेली साडी खराब निघाल्याने ती परत केल्यानंतर अनंत नारायण कुलकर्णी (वय ६७, गणेश कॉलनी) यांना सायबर ...

Ordered sarees online; 75 thousand rupees to an old woman | ऑनलाइन साडी मागविली; वृद्धाला ७५ हजारांचा गंडा

ऑनलाइन साडी मागविली; वृद्धाला ७५ हजारांचा गंडा

जळगाव : ऑनलाइन मागविलेली साडी खराब निघाल्याने ती परत केल्यानंतर अनंत नारायण कुलकर्णी (वय ६७, गणेश कॉलनी) यांना सायबर गुन्हेगाराने ७४ हजार ९९९ रुपयांत ऑनलाइन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त कर्मचारी असलेले अनंत नारायण कुलकर्णी यांनी यांनी ३१ ऑगस्ट रोजी आयबीआयएसबी या कंपनीतून ऑनलाइन साडी मागविली होती. मात्र ही खराब निघाल्याने कुळकर्णी यांनी गुगलवरून कंपनीचा संपर्क क्रमांक मिळविला. त्यावर संपर्क साधला असता, संबंधितांनी एनी डेक्स ॲप डाऊनलोड करायला सांगितले. यादरम्यान कुलकर्णी यांना त्यांचा मोबाइल नंबरही दिला. ॲप डाऊनलोड करताच कुलकर्णी यांच्या बँकखात्यातून पहिल्या वेळी २५ हजार, दुसऱ्या वेळी ४९ हजार ९९९ असे एकूण ७४ हजार ९९९ रुपये कपात झाल्याचा कुलकर्णी यांना मेसेज आले. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर त्यांनी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार तुषार जावरे करीत आहेत.

Web Title: Ordered sarees online; 75 thousand rupees to an old woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.