आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:52+5:302021-03-04T04:29:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आशादीप वसतिगृह प्रकरणात आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला दिले ...

आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आशादीप वसतिगृह प्रकरणात आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. याबाबत गृह मंत्रालयाच्या कक्ष अधिकारी यांनी जिल्हा प्रशासानाला मेल पाठवून या प्रकरणात चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आशादीप वसतिगृहात बाहेरील पुरुषांनी तेथील महिलांना नृत्य करण्यास भाग पाडल्याची तक्रार समोर आली होती. या प्रकरणाने विधी मंडळात वादळी चर्चा झाली. भाजपच्या आमदारांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर गृह मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला याबाबत आठ दिवसात अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यासोबतच जिल्हा प्रशासनाने प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेत या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
महिला आणि बालकल्याण विभागाची समिती उद्या येणार
जळगावातील या प्रकाराची चौकशी करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाची स्वतंत्र समिती उद्या जळगावला येणार आहे. महिला आणि बाल अधिकारी शेलार या त्याच्या प्रमुख असतील. या समितीने जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागाशी संपर्क साधला आहे. उद्या ही समिती याची चौकशी करणार आहे.