धोकेदायक इमारतींच्या मालकांना नोटीस देण्याचे आदेश

By Admin | Updated: May 19, 2017 15:21 IST2017-05-19T15:21:20+5:302017-05-19T15:21:20+5:30

धोकेदायक इमारतींचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण पूर्ण करून संबधित इमारत मालकांना

Order to give notice to the owner of the building | धोकेदायक इमारतींच्या मालकांना नोटीस देण्याचे आदेश

धोकेदायक इमारतींच्या मालकांना नोटीस देण्याचे आदेश

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 19 - पावसाळ्यादरम्यान जीर्ण झालेल्या इमारती पडून अनेकदा जिवीत व वित्त हाणी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरातील  धोकेदायक इमारतींचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण पूर्ण करून संबधित इमारत मालकांना इमारतींची दुरुस्ती किंवा पाडण्यासंबधी नोटीस द्या, अशा सूचना जळगाव मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी मनपा बांधकाम विभाग अभियंत्यांना दिल्या आहे.
मान्सूनच्या पाश्र्वभूमीवर मनपा आयुक्तांच्या दालनात मनपातील सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत मान्सून आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या बैठकीत उपायुक्तांसह, सर्वच विभागातील अधिकारी  उपस्थित होते. बैठकीत शहरात सुरू असलेल्या नालेसफाईचा आढावा घेण्यात आला. यासह  अतिक्रमण, गटारी साफसफाई, खड्डे याचीही माहिती आयुक्तांनी घेतली.
मनपाकडून सुरू असलेल्या मान्सून पूर्व नालेसफाईची मुदत 20 मे र्पयत देण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी ही मुदत संपणार आहे. सोमवारी मनपा आयुक्त नालेसफाईच्या कामांना भेटी देण्याची शक्यता आहे. यासह प्रत्येक वार्डातील गटारी सफाईंच्या कामांचादेखील आढावा या बैठकीत घेण्यात आला.
मान्सुनच्या सुरुवातीला वादळी वा:यांसह पावसाची शक्यता असते. अनेकदा वादळी वा:यांमुळे वृक्ष कोलमडणे व यामुळे विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी शहरातील जे वृक्ष धोकेदायक आहेत अशी वृक्ष तोडण्याचा सूचना आढावा बैठकीत मनपा आयुक्तांनी दिल्या.

Web Title: Order to give notice to the owner of the building