जुवार्डी सोसायटीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश तीन वर्षांनंतर रद्दबातल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:04+5:302021-09-08T04:21:04+5:30
विद्यमान संचालक मंडळाचा उणेपुरे काही महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. जुवार्डी विविध कार्यकारी सोसायटीची २०१५ मध्ये बिनविरोध निवड झाली. एकूण ...

जुवार्डी सोसायटीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश तीन वर्षांनंतर रद्दबातल
विद्यमान संचालक मंडळाचा उणेपुरे काही महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे.
जुवार्डी विविध कार्यकारी सोसायटीची २०१५ मध्ये बिनविरोध निवड झाली. एकूण १३ जागांपैकी १ जागा त्या प्रजातीच्या उमेदवाराअभावी रिक्त राहिली. अडीच-तीन वर्षे कारभार सुरळीत असताना २०१८मध्ये संस्थेत राजीनामा नाट्य घडले. सात संचालकांनी राजीनामे दिलेत. एक जागा आधीच रिक्त होती. आठ जागा रिक्त झाल्याने कोरमअभावी सहायक निबंधक भडगाव यांनी संस्थेवर ३ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रशासकाच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.
प्रशासक नियुक्तीच्या आदेशाविरोधात संजय शिवाजी पाटील व युवराज श्रावण पाटील यांनी विभागीय सहायक निबंधक, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते.
कोरोनामुळे सुनावणी लांबली. यानंतर काही तारखांना सुनावणी होत, अपील मान्य करीत ३० जुलै रोजी प्रशासक नियुक्तीचा आदेश विभागीय सहनिबंधकांनी रद्दबातल ठरविला आहे.
सुनावणीत सहायक निबंधकांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ७७अ (ब १)(फ)(दोन) अन्वये प्रशासक नियुक्तीचा आदेश काढण्यापूर्वी संस्थेच्या सूचना फलकावर आदेशासंबंधाने हरकती व सूचना मागविल्याचे दिसून येत नसल्याचे वा संबंधित नोटीस प्रसिद्ध करणे व्यवहार्य नसल्याबाबत निबंधकांची खात्री झाल्याचे आदेशात नमूद नसल्याचा निष्कर्ष काढत प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्दबातल ठरविला आहे.