पातोंडा येथे वृक्ष लागवडीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST2021-06-22T04:11:40+5:302021-06-22T04:11:40+5:30

सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ व ग्रामविकास अधिकारी बी. वाय. पाटील यांच्या सहकार्याने पातोंडा ग्रामपंचायतीने ठराव करून ...

Opposition to tree planting at Patonda | पातोंडा येथे वृक्ष लागवडीस विरोध

पातोंडा येथे वृक्ष लागवडीस विरोध

सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ व ग्रामविकास अधिकारी बी. वाय. पाटील यांच्या सहकार्याने पातोंडा ग्रामपंचायतीने ठराव करून गावठाण जागेत पातोंडा विकास मंचतर्फे दोन हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी खड्डे खोदणे सुरू होते. त्यावेळी उघड्यावर शौचास जाणाऱ्या काही महिला व काही ग्रामस्थ व काही ग्रामपंचायत सदस्य तेथे येऊन गोंधळ घालू लागले. आणि या ठिकाणी वृक्ष लागवड केल्यास उपटून टाकू, महिलांना शौचालयास जाण्यास जागा नाही असे म्हणून गोंधळ घातला. काहींचे अतिक्रमित खळे असल्याने त्यांनीही विरोध केला. पातोंडा ग्रामपंचायत हागणदारीमुक्त असून, वैयक्तिक शौचालय अनुदान प्रत्येकाला देऊनदेखील महिला बाहेर शौचालयास जातात याबाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत सदस्यदेखील विरोध करीत असल्याने काही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

वृक्ष लागवड हा शासनाचा उपक्रम आहे. त्याला विरोध करून उघड्यावर शौचास जाणाऱ्यावर कारवाई केली जाईल, तसेच उघड्यावर शौचास जाण्याचे समर्थन करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी विरोध केल्यास ते अपात्र होऊ शकतात, असे सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सांगितले.

Web Title: Opposition to tree planting at Patonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.