ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.1 - पिंप्राळा भागातील मयुर कॉलनी, गणपती नगर, प्रल्हाद नगर या भागात परमीट रुम,बियर बार व दारु दुकान सुरु होत असल्याने त्याला परवानी देवू नये. या भागात बार सुरु झाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. प्रायस बहुउद्देशीय विकास संस्थेच्या पदाधिका:यांनी महिलांना सोबत घेवून गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एस.एल.आढाव यांची भेट घेवून निवेदन सादर केले.
पिंप्राळा भागात प्रभाग क्र.15 मधील लोकवस्तीच्या परिसरात गट क्र.306 व 307 येथे मद्य विक्रीचे दुकान सुरु होत आहे. या भागात दारु दुकानांना विरोध असल्याने 18 मे रोजी जिल्हाधिकारी व 23 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना संस्थेमार्फत निवेदन देण्यात आले आहे. या ठिकाणी दारुचे दुकान सुरु झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, मात्र तरीही त्याची दखल घेण्यात आली नाही. आता रमजान महिना सुरु झाला आहे. या भागात मशिद आहे. अशा परिस्थितीत दारु दुकानांना परवानगी देणे योग्य नाही, ही परवानगी रद्द झाली नाही तर 8 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष विकास विठ्ठल चौधरी, उपाध्यक्ष ¨हतेश प्रकाश कोष्टी, सचिव संतोष शेळके, द्वारकाबाई पितांबर हिवरकर, विमलबाई भगवान महाजन, कल्पना संजय चौधरी, जयश्री अनिल कहाणे, सुरेखा सुरेश पाटील, मंगला पंढरी महाजन, छाया धनराज कुंभार, भारती बबलु कुंभार, उषा समीर पाटील, कल्पना पंढरीनाथ चौधरी यांच्यासह रहिवाशी उपस्थित होते.