पायी वारीला विरोध, जामनेरला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST2021-07-18T04:12:42+5:302021-07-18T04:12:42+5:30
जामनेर : जनजीवन सामान्य होत असताना केवळ पायी वारीला विरोध केल्याने ७५० वर्षांची परंपरा खंडित होत असल्याने येथील विश्व ...

पायी वारीला विरोध, जामनेरला निषेध
जामनेर : जनजीवन सामान्य होत असताना केवळ पायी वारीला विरोध केल्याने ७५० वर्षांची परंपरा खंडित होत असल्याने येथील विश्व हिंदू परिषदेने शासनाच्या निर्णयाचा निषेध करून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारी पूजेसाठी येऊ नये, असे निवेदन शनिवारी नायब तहसीलदारांना दिले.
निरपराध साधू-संतांना अटक करून अपराध्यांप्रमाणे वागणूक देणाऱ्या शासनाने माफी मागावी व दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रवीण सुषिर, गजानन लोणारी, डॉ. मनोज विसपुते, श्याम चैतन्य महाराज, गोपाल बुळे, अशोक बावस्कर, हभप परमेश्वर महाराज, अमोल महाराज, ईश्वर महाराज, चेतन नेमाडे, यश ठाकूर, पवन बावस्कर, यश पर्वते, सुभाष पवार, जयेश महाजन, महेश तेली, नितीन सुराणा, चारुदत्त बाविस्कर उपस्थित होते.