चित्रकारांना आता आर्ट गॅलरीत संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST2021-07-19T04:13:05+5:302021-07-19T04:13:05+5:30

जळगाव : खान्देशातील नवोदित, तरुण चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील आर्ट गॅलरीसह नागपूर, नाशिक, पुणे आदी शहरांमधील आर्ट गॅलरीत भरवता ...

Opportunity for painters in art galleries now | चित्रकारांना आता आर्ट गॅलरीत संधी

चित्रकारांना आता आर्ट गॅलरीत संधी

जळगाव : खान्देशातील नवोदित, तरुण चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील आर्ट गॅलरीसह नागपूर, नाशिक, पुणे आदी शहरांमधील आर्ट गॅलरीत भरवता येणार आहे. जळगाव येथील सामाजिक संस्था लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान यांच्या पाठपुराव्यानंतर हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.

लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम जोशी यांनी आर्ट गॅलरीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. नवोदित चित्रकारांचे प्रदर्शन मोलाच्या आर्ट गॅलरीत लावण्याबाबत त्यांच्या नियमांच्या चौकटीत राहून असे प्रदर्शन मांडता यावे यासाठी पाठपुरावा केला. मुंबई, नागपूर, नाशिक आदी महाराष्ट्रातील निवडक आर्ट गॅलरींमध्येही या चित्रांचे प्रदर्शन मांडता येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांना मुंबई व महाराष्ट्रातील अन्य शहरांतील गॅलरीत आपल्या चित्रप्रदर्शनांची मांडणी करण्याची इच्छा आहे अशांनी लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान, जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दीक्षितवाडी जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन संग्राम जोशी यांनी केले आहे.

Web Title: Opportunity for painters in art galleries now