‘सर्व पुढारी चोर आहेत’ म्हणत पारोळा शेतकी मतदार संघाच्या निवडणुकीत मतदाराने काढला संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 17:09 IST2017-11-27T17:04:28+5:302017-11-27T17:09:29+5:30
आॅनलाईन लोकमत जळगाव,दि.२७ : पारोळा शेतकी मतदार संघाची निवडणूक होऊन सोमवारी त्याचा निकाल घोषित झाला. यावेळी एका मतदाराने मतपत्रिकेवर ...

‘सर्व पुढारी चोर आहेत’ म्हणत पारोळा शेतकी मतदार संघाच्या निवडणुकीत मतदाराने काढला संताप
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२७ : पारोळा शेतकी मतदार संघाची निवडणूक होऊन सोमवारी त्याचा निकाल घोषित झाला. यावेळी एका मतदाराने मतपत्रिकेवर ‘सर्व पुढारी चोर आहेत’ म्हणत आपला संताप व्यक्त केला.
पारोळा शेतकी संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचे शेतकरी पॅनल व आमदार डॉ.सतीश पाटील, खासदार ए.टी.पाटील यांच्या जनाधार पॅनलमध्ये लढत झाली.
मतदाराने मतपत्रिकेवर लिहिले, ‘सर्व पुढारी चोर आहेत’
मतदानावेळी एका मतदाराने ‘सर्व पुढारी चोर आहेत’ असे लिहित मतपत्रिका पेटीत टाकली होती. तर काही मतदारांनी मतपत्रिकेवर हाताचा अंगठा टेकून मत दिले होते. मतमोजणीच्या वेळी ते मतदान बाद केले.
शिवसेनेचा सर्व १५ जागांवर विजय
यावेळी शिवसेनेच्या १५ च्या १५ जागांवर विजय घोषित होताच शिवसेनेच्या कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला. विजयी मिरवणूक चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत बाजारपेठेतून काढण्यात आली. डोल ताशांच्या गजरात गुलाल उधळून आनंद साजरा केला. विजयी उमेदवारांचे माजी आमदार चिमणराव पाटील, जि.प.सदस्य डॉ.हर्षल माने, कृ.उ.बा.समिती सभापती अमोल पाटील, न.पा.गटनेते मंगेश तांबे, जिजाबराव पाटील, जितेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले. निवडणूक अधिकारी म्हणून ए.ए. गावळे यांनी काम पाहिले.
भाजपा व राष्ट्रवादीच्या पॅनलचा दारूण पराभव
सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती संस्था मतदार संघाची मतमोजणी प्रथम झाली. यात १०१ पैकी ७ मते बाद झाली होती. सर्वात जास्त मते (६२) अरुण दामू पाटील यांना मिळाली. भाजपाचे खासदार ए.टी.पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, नगराध्यक्ष करण पवार यांच्या जनाधार पॅनलला माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या शेतकरी पॅनेलने धूळ चारीत २५ वर्षापासूनची सत्ता कायम ठेवली. शिवसेनेने सहकार क्षेत्रात आपली असलेली पकड मजबूत केली. बाद मतदानाचे प्रमाण संस्था मतदार संघात (७) जनरल मतदार संघात (१०९१) एवढे मते बाद झाली.