ईडीची चौकशी लावून विरोधकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:16+5:302021-09-05T04:21:16+5:30
चाळीसगाव : जयंत पाटील यांचा आरोप चाळीसगाव : ईडीच्या माध्यमातून चौकशी लावून विरोधकांना बदनाम करण्याचा डाव मांडला ...

ईडीची चौकशी लावून विरोधकांना
चाळीसगाव : जयंत पाटील यांचा आरोप
चाळीसगाव : ईडीच्या माध्यमातून चौकशी लावून विरोधकांना बदनाम करण्याचा डाव मांडला जात आहे, कोणतीही चूक नसताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी ते शनिवारी चाळीसगाव येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बारा आमदारांच्या प्रश्नाबाबत मंत्री पाटील म्हणाले की, राज्य सरकारने बारा नावे सुचविली असून त्यावर राज्यपालांनी तपासून निर्णय घ्यायला हवा; परंतु लोकशाहीचे संकेत पायदळी तुडविले जात असल्याचे राज्यातील लोकांना वाटू लागले आहे. दोन नावे वगळण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून राज्यपाल यांनी लवकर याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी ओबीसीचा प्रश्न मार्गी सर्वपक्षीय बैठक कालच झाली. त्यात सर्व पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे त्याबाबत कोणीही वेगळी घोषणा देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.