चाळीसगावला पद्मावत चित्रपट प्रदर्शनाला चार संघटनांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 14:13 IST2018-01-24T14:12:59+5:302018-01-24T14:13:08+5:30
50हून अधिक पदाधिकारी उपस्थित

चाळीसगावला पद्मावत चित्रपट प्रदर्शनाला चार संघटनांचा विरोध
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जळगाव, दि. 24- वादग्रस्त पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला असला तरी संघटनांचा विरोध मात्र कायम आहे. चाळीसगावसह अन्यत्रही पद्मावत प्रदर्शित करु नये म्हणून राजपुत करणी सेनेसह संभाजी सेना, रयत सेना यांनीही बुधवारी दुपारी साडेबारा वाजता चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांना निवेदन दिले. पदमावत चित्रपटामुळे इतिहासाची मोडतोड झाली असून चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तीनही संघटनांचेही 50हून अधिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.