शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षा केंद्राचे राज्यपालांच्याहस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:12 IST

केंद्राची पाहणी करून उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान

ठळक मुद्देसहा कक्षांमध्ये 215 संगणकविविध स्पर्धा परीक्षांचा एकाच छताखाली सराव

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उभारण्यात आलेल्या सुसज्ज अशा ऑनलाईन परीक्षा केंद्राचे उद्घाटन बुधवार, 20 डिसेंबर रोजी राज्यपाल तथा कुलपती  सी.विद्यासागर राव यांच्याहस्ते  करण्यात आले. उद्घाटनानंतर झालेल्या चर्चेत राज्यपालांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासाबद्दल समाधान व्यक्त केले.राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत ऑनलाईन परीक्षा केंद्रासाठी निधी प्राप्त झाला आहे. विद्यापीठाच्या गणितीयशास्त्र प्रशाळेच्या विस्तारीत इमारतीत उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याहस्ते सकाळी झाले. यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.डी.एन. गुजराथी, ऑनलाईन परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा.समीर नारखेडे हे उपस्थित होते.

उद्घाटनानंतर राज्यपालांनी या केंद्राची पाहणी करून विद्याथ्र्याना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रारंभी कुलगुरु प्रा.पी.पी. पाटील यांनी राज्यपालांचे पुस्तक देवून स्वागत केले. त्यानंतर जैवशास्त्र  प्रशाळेचे संचालक प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी राज्यपालांसमोर विद्यापीठाच्या प्रगतीचे सादरीकरण केले. परीक्षांचे निकाल 30 ते 45 दिवसांच्या आत लावण्यात आलेले यश, नंदुरबार येथे उभारण्यात येणा:या आदिवासी अकादमीची माहिती व त्यात सुरु केले जाणारे अभ्यासक्रम, विद्यापीठातर्फे राबविण्यात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम याची सविस्तर माहिती सादरीकरणात देण्यात आली. आदिवासी अकादमीबाबत तसेच चाळीसगाव येथे  राज्य शासनातर्फे उभारण्यात येणा:या भास्कराचार्य  गणितीय  नगरीतील  काही  अभ्यासक्रमाबाबत राज्यपालांनी कुलगुरुंसमवेत चर्चा केली.  विद्यापीठाच्या आश्वासक प्रगतीबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. या संवादाच्या वेळी विद्यापीठ प्रशाळेचे सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.

  आज उद्घाटन झालेल्या ऑनलाईन परीक्षा केंद्रात सहा कक्षांमध्ये 215 संगणक ठेवण्यात आल असून ते अद्ययावत चार सव्र्हरशी जोडण्यात आले आहेत.  विद्याथ्र्यांना विविध स्पर्धा परीक्षांचा एकाच छताखाली सराव करण्याच्या दृष्टीने हे केंद्र उपयुक्त ठरणार असून विविध कार्यशाळा, प्रशिक्षण तसेच पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा, प्री-पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षा यासाठीदेखील हे केंद्र उपयुक्त ठरणार आहेत.  सरकारकडून घेण्यात येणा:या विविध नोकर भरतीच्या प्रवेश परीक्षेसाठीदेखील हे केंद्र उपयोगी ठरणार आहे.