पांडुरंग नगरातील """"ओपन स्पेस"""" नागरिकांसाठीच राखीव राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST2020-12-05T04:25:26+5:302020-12-05T04:25:26+5:30

जळगाव : शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील पांडुरंग नगरात असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग कुणीतरी इतर सामाजिक संस्थाचालक करणार असल्याची ...

'' '' '' '' Open space in Pandurang will be reserved for citizens only | पांडुरंग नगरातील """"ओपन स्पेस"""" नागरिकांसाठीच राखीव राहणार

पांडुरंग नगरातील """"ओपन स्पेस"""" नागरिकांसाठीच राखीव राहणार

जळगाव : शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील पांडुरंग नगरात असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग कुणीतरी इतर सामाजिक संस्थाचालक करणार असल्याची माहिती नागरिकांनी उपमहापौरांना दिली. दरम्यान, परिसरातील नागरिकांच्या संमती शिवाय कुणीही जागा ताब्यात घेऊ शकत नाही. परिसरातील नागरिकांसाठी असलेली जागा त्यांच्यासाठीच राखीव राहील असे आश्वासन उपमहापौर सुनील खडके यांनी गुरूवारी नागरिकांना दिले.

''''''''उपमहापौर आपल्या दारी'''''''' उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ९ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेविका प्रतिभा देशमुख, मयूर कापसे, विजय पाटील, ॲड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, अमित काळे, भारत कोळी, मनोज काळे, गजानन देशमुख आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

पांडुरंग नगरच्या वळण रस्त्यावर एका व्यक्तीच्या तीन ट्रक अनेक महिन्यांपासून पडून असल्याने त्याठिकाणी मद्यपी दारू पितात तसेच ट्रकच्या आडोशाला काही लोक शौचास आणि मूत्र विसर्जन करण्यासाठी जात असल्याने त्रास होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ ट्रक मालकाला बोलावून तंबी दिली तसेच ट्रक आठ दिवसात न हटविल्यास कारवाई करण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या.

Web Title: '' '' '' '' Open space in Pandurang will be reserved for citizens only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.