शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

याठिकाणी भरली जाते पुरुषांची ओटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 5:05 PM

सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त अमळनेरात मोफत रोग निदान शिबिर, शिधा वाटप, अन्नपूर्णा पूजा

ठळक मुद्देअमळनेरात सर्व धर्मियांना केला शिधा वाटपगाडीभर भात करीत केली अन्नपूर्णा पूजागोविंद भगवानराव लोंटांगणे यांनी लोटांगण घालत केले दीड तास चक्री भजन

आॅनलाईन लोकमतअमळनेर,दि.३० - संत सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त २९ रोजी प्रसाद महाराजांनी १५०० महिला पुरुषांची ओटी भरण्यात आली. तर सेवेकऱ्यांना शिधा वाटप करण्यात येऊन सर्व रोग तपासणी शिबिर घेत गरजूंना मोफत औषधी वाटप करण्यात आलेपुरुषांची ही ओटी भरली जातेसर्वसाधारणपणे ओटी महिलांची भरली जाते. मात्र सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त पुरुष, महिला अथवा जोडीने ओटी भरली जाते. २९ रोजी सुमारे १५०० लोकांची प्रसाद महाराज यांच्या हस्ते ओटी भरण्यात आली. ब्लाउज पीस व तांदूळ ओटीत टाकला जातो. पुरुषांना खडी साखर दिली जाते. ओटीसाठी ४ क्विंटल तांदूळ लागला. ओटी भरली गेली तर महिलेचे सौभाग्य वाढते अशी श्रद्धा आहे.गाडीभर भात करीत केली अन्नपूर्णा पूजारात्री अन्नपूर्णा देवतेची पूजा करण्यात आली. सुमारे गाडीभर भात करून त्यावर अन्नपूर्णा देवतेचे दिवे तसेच भरड्याचे वडे ठेवून पूजा केली जाते. त्यानंतर तो भात नाभिक समाजाला देण्याची प्रथा आहे. तर वडे लोक प्रसाद म्हणून घरी नेऊन धान्यात ठेवतात. वडे धान्यात ठेवल्यास कधीच अन्न धान्य अपूर्ण पडत नाही अशी श्रद्धा आहे. सखाराम महाराज पुण्यतिथीची द्विशताब्दी असल्याने पुणे येथे २६ मे रोजी विष्णुयाग यज्ञ करण्यात येणार आहे. तर २ जून रोजी औरंगाबाद येथे ११ हजार लोक दासबोध पारायण करणार आहेत. तसेच पुढील वर्षी बोरी नदी पात्रात १०० कुंडी यज्ञ करण्यात येणार आहे.लोटांगण चक्री भजनसकाळी ९ ते ११ या दरम्यान पूजा पराग यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. हभप भगवानबुवा सडगावकर, बेलापूरकर महाराज, प्रकाशबुवा , त्र्यंबकबुवा शेजवळकर, रुपचंद महाराज यांचे कीर्तन झाले. तर पारणे जि.जालना येथील गोविंद भगवानराव लोंटांगणे यांचे देवासमोर लोटांगण घालत दीड तास चक्री भजन झालेसर्व धर्मियांना शिधा वाटपवर्षभर वाडी संस्थांची व सखाराम महाराजांची यात्रेत व इतरवेळी सेवा करणाºया सुतार , लोहार, चर्मकार, पाटील, ब्राम्हण, खाटीक, कसाई, मातंग, फकीर, परीट, नाभिक, भिक्षुक अशा सर्व समाजाच्या लोकांना संस्थांतर्फे महाराजांनी तेल, मीठ, हळद, गहू तांदूळ, पीठ शिधा वाटप करण्यात आले.

टॅग्स :AmalnerअमळनेरJalgaonजळगाव