तीन गुन्ह्यातील आरोपी निघाला अखेर एकच
By Admin | Updated: October 9, 2015 00:14 IST2015-10-09T00:14:26+5:302015-10-09T00:14:26+5:30
नंदुरबार : व्यक्तिगत वादातून सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून तीन वेगवेगळ्या पोस्ट टाकून सामाजिक बदनामी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

तीन गुन्ह्यातील आरोपी निघाला अखेर एकच
नंदुरबार : व्यक्तिगत वादातून सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून तीन वेगवेगळ्या पोस्ट टाकून सामाजिक बदनामी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पोलिसांनी जिल्ह्यात दाखल तिन्ही सायबर गुन्ह्यांची उकल केली असून तिन्ही गुन्ह्यातील आरोपी एकच व्यक्ती असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सोशल मीडिया अर्थात फेसबुकच्या माध्यमातून आदिवासी समाज आणि एक तरुणी, तसेच राष्ट्रीय नेत्यांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून धार्मिक भावना भडकविण्यात आल्या होत्या. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. पहिल्या गुन्ह्यात एका मुलीच्या नावाने खोटी प्रोफाईल आयडी बनवून त्यावर नेत्यांविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. दुस:या गुन्ह्यात एका मुलाच्या नावाने खोटी प्रोफाईल आयडी बनवून आदिवासी समाजाच्या भावना दुखाविणारा मजकूर टाकला होता. याच प्रोफाईलवरून एका तरुणीबाबतही आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. नंदुरबार शहर व उपनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आदिवासी समाजाबाबतच्या पोस्टमुळे मोर्चे आणि बंदसारखे आंदोलन जिल्हाभर करण्यात आले होते. तिन्ही गुन्ह्यांचा तांत्रिक तपास पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार सायबर सेलकडून सुरू होता. सर्व तांत्रिक बाबींचे वेिषण करून त्याआधारे तिन्ही गुन्ह्यांमध्ये एकच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यास अटकदेखील करण्यात आली. अटक करण्यात आलेल्याने त्याच्या वैयक्तिक वादातून खोटय़ा प्रोफाईल तयार करून सामाजिक व व्यक्तिगत बदनामी करणारे आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक महेश घुर्ये, अपर अधीक्षक अनिता पाटील, उपविभागीय अधिकारी शिवाजी गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, शहर पोलीस निरीक्षक अनिल कटके, उपनगरचे प्रदीप ठाकूर, सायबर सेलचे प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, मोहन ढमढेरे यांनी तपास केला. दरम्यान, समाजकंटक, विघAसंतोषी लोकांकडून त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा हेव्यादाव्यांसाठी, वैयक्तिक आकसापोटी माहिती व तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक, उच्चपदस्थ नेते, धार्मिक बाबी किंवा व्यक्तिगत पातळीवर बदनामी करणारे मजकूर टाकले जातात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये सारासार विचार करून दुर्लक्ष करावे व अशी बाब निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे. पोलिसांकडून लागलीच दखल घेतली जाते. तांत्रिक तपासासाठी ठरावीक कालावधी लागतो; परंतु गुन्हेगारार्पयत पोलीस पोहचतातच. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर ज्ञानवृद्धीसाठी करावा, अशी अपेक्षाही पोलिसांनी व्यक्त केली.