जळगाव : तालुक्यात असलेली फुपणी जिल्हा परिषद शाळाने गुणवत्ता विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुर्वांगिण विकास साधण्याचा ध्यास घेतला आहे़ शाळेत १ ते ४ वर्ग असून एकूण ३९ पटसंख्या आहे.शाळांविषयी जनसामान्यांचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर परिवर्तन महत्त्वाचे आहे, हा विचार येथील मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जाणला आणि शाळेत भौतिक सोईसुविधा निर्माण करतानाच ज्ञान घेण्यासाठी पूरक वातावरणनिर्मितीही केली. शाळेला भव्य क्रीडांगण आहे; त्यामुळे क्रीडा स्पर्धांतूनही शाळा मागे नाही. दरम्यान, शाळेच्या भिंतींना आकर्षक रंगरंगोटी केल्यामुळे बोलक्या भिंती निर्माण आहे.स्वखर्चातून शाळा डिजीटलशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वखचार्तून विद्यार्थांसाठी एलईडी टीव्ही संच घेवून दिला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण मिळणार आहे़ दरम्यान, मुख्याध्यापक नंदकिशोर लोंकलकर व शिक्षक पंकज गरूड यांनी हा टीव्ही संच घेतला आहे़ यावेळी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांच्याहस्ते तो शाळेला प्रदान करण्यात आला. त्यावेळी शीतल पाटील, लक्ष्मण वाघ, साधना पाटील, कमल वाघ, मीराबाई ठाकरे, उषा वाघ, युवराज परदेशी, कैलास सपकाळे, पंकज गरूड उपस्थित होते.विद्यार्थ्यांचे औक्षणनावीण्यपूर्ण उपक्रमांवर शाळेचा भर आहे़ शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो़ तर विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी त्यांचे औक्षण करून शाळेमध्ये चॉकलेट वाटप केले जाते़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद दिसून येतो़ क्षेत्रभेटीतंर्गत विविध स्थळांना शाळेकडून भेटी देण्यात येतात़ त्यातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती दिली जाते़ प्रोजक्टरद्वारे डिजीटल शिक्षण तर दिले जाते़ तर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे विद्यार्थ्यांना पटवून देण्याचे काम शाळा उपक्रमातून करत आहे.पालक, नागरिकांकडून शाळेला मदतीचा हातविद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणाºया या शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालक, नागरिक मदतीचा हात देतात.
एकच ध्यास विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 21:56 IST
नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर : लोकसहभाग व स्वखर्चातून शिक्षकांनी केली ‘फुपणी जि.प.’शाळा डिजीटल
एकच ध्यास विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास..!
ठळक मुद्देशाळेची वैशिष्टे : प्रशस्त इमारत, क्रीडांगण, निसर्गरम्य वातावरणस्वच्छ सुंदर शाळा, सुसज्ज सुविधा तसेच डिजीटल शाळा