शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

5 लाखांच्या शहरासाठी फक्त 4 बंब, जळगाव मनपा प्रशासनाची अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:21 PM

4 पैकी 2 बंबांचा वापर शौचालयांमध्ये पाणी टाकण्यासाठी

ठळक मुद्देपूर्वी 14 बंब, आता फक्त 2नवीन केंद्राचे प्रस्ताव थंडबस्त्यात

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 6 -  सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहरासाठी फक्त 4 अगिAशमन दलाचे बंब आहेत. त्यापैकी 2 बंबांचा वापर शौचालयांमध्ये पाणी भरण्यासाठी प्रशासनाकडून केला जात आहे. सध्या उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात जळगावात अनेक आगी लागतात, त्या नियंत्रणात आणणे जिकिरीचे जाते. एकीकडे अगिAशमन दलाकडे दीड कोटीचा निधी यऊन पडला आहे, त्याचा विनियोग करण्यात आलेला नाही. 2 फेब्रुवारी रोजी मनपा स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर चार वाहने खरेदी करण्यात येतील, अशी माहिती प्रभारी आयुक्तांनी दिली. मात्र हे नवीन बंब उन्हाळा संपल्यानंतर शहरात दाखल होतील. त्यामुळे  आतार्पयत प्रशासन करीत तरी काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्षभरात 157 आगीच्या घटनागतवर्षात शहरात आगीच्या तब्बल 157 घटना घडल्या. यात सर्वाधिक 76 आगी उन्हाळ्यात लागल्या. तरीही महापालिकेचा अगिAशमन विभाग सक्षम करण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्षच होत आहे. दोन ते अडीच कोटींचा निधी खर्च करण्यासाठी सदस्यांनी तब्बल तीन वर्षे पाठपुरावा केला तरीही अनेक प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत. आजही या विभागाकडे दीड कोटीपेक्षा अधिक निधी पडून आहे. प्रशासनाची चालढकलमहापालिकेच्या अगिAशमन विभागाबद्दल प्रत्येक महासभा व स्थायी समितीच्या सभेत सदस्य नाराजी व्यक्त करीत असतात. दरवर्षी शासनाकडूनही अगिAशमन विभाग बळकटीकरणासाठी निधी मिळत असतो. गेल्या वर्षी या विभागाकडे सुमारे तीन ते साडेतीन कोटींचा निधी पडून होता. मात्र या विभागाच्या दुर्दशेबाबत प्रशासन गंभीर  नव्हतेच.नवीन केंद्राचे प्रस्ताव थंडबस्त्यातशहरातील कालिंकामाता मंदिर परिसर व सुरक्षानगर भागात नवीन अगिAशमन केंद्र सुरू करणे प्रस्तावित होते. यासाठी जागाही गेल्या वर्षी निश्चित झाली. मात्र नगररचना विभागाकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. जागेवर आरक्षणाच्या गोंधळामुळे हे काम अद्याप होऊ शकलेले नाही. या भागात आग लागल्यास शहरातून बंब पाठवावे लागतात. तोवर आग लागलेल्या ठिकाणाची राखरांगोळी झालेली असते. त्यामुळे केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी 14 बंब, आता फक्त 2महापालिकेकडे पूर्वी 14 अगिAशमन बंब होते. त्यातील बहुतांश निर्लेखित झाले. ही वाहने अनेक ठिकाणी भंगारमध्ये पडून आहेत. आजच्या स्थितीत महापालिकेकडे केवळ 4 बंब आहेत. त्यातील दोन बंबांचा वापर रोज शौचालयांमध्ये पाणी टाकण्यासाठी प्रशासनाकडून केला जात असतो. गेल्या वर्षी शिल्लक असलेल्या दोन ते अडीच कोटींच्या निधीतून किमान वाहने व विविध साहित्य खरेदी करावे यासाठी नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला.  चार बंब खरेदीचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात दोन मोठे व दोन लहान अगिAशमन बंब येतील. मात्र त्याला अजूनही तीन ते चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. आठ वर्षानंतर मिळाले 35 लाखांचे साहित्य अगिAशमन दलातील जवानांकडे साधे ड्रेस नव्हते. तसेच आगीच्या क्षेत्रात जायचे असेल तर आगीचा प्रतिकार करू  शकतील असे साहित्य फारसे नव्हते. जानेवारीच्या प्रारंभी हे साहित्य या विभागास मिळाले. तब्बल 8 वर्षानंतर अगिAशमन दलास हे साहित्य प्राप्त झाले.