ग्रामपंचायतींसाठी केवळ 20 उमेदवारी अर्ज अवैध
By Admin | Updated: December 6, 2015 00:26 IST2015-12-06T00:26:07+5:302015-12-06T00:26:07+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची शनिवारी छाननी करण्यात आली़ यात तळोदा तालुक्यात सात, धडगाव 11 तर नवापूर तालुक्यात दोन असे केवळ 20 अर्ज अवैध ठरले आहेत़

ग्रामपंचायतींसाठी केवळ 20 उमेदवारी अर्ज अवैध
8 रोजी माघार : दोन हजार अर्ज शिल्लक नंदुरबार : जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची शनिवारी छाननी करण्यात आली़ यात तळोदा तालुक्यात सात, धडगाव 11 तर नवापूर तालुक्यात दोन असे केवळ 20 अर्ज अवैध ठरले आहेत़ अक्कलकुव्यात रात्री उशिरार्पयत छाननी सुरू होती़ शहादा तालुक्यातीन दोन ग्रामपंचायतींसाठी सर्व 30 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत़ धडगाव तालुक्यात 21 ग्रामपंचायतींसाठी 486 अर्ज दाखल झाले होत़े यात 11 अर्ज अवैध ठरवण्यात आल़े तळोदा तालुक्यातील सात उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आल़े नवापूर तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या 164 प्रभागात 436 अर्जापैकी दोन अर्ज अवैध ठरण्यात आले आहेत़ दोन्ही अर्ज हे मौलीपाडा येथील ग्रामपंचायतींसाठी होत़े दोन हजारांवर अर्ज पात्र जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतींसाठी दोन हजार 199 अर्ज प्राप्त झाले होत़े छाननीअंती 20 अर्ज अवैध ठरल्याने दोन हजार 179 अर्ज वैध आहेत. अक्कलकुवा तालुक्यात रात्री उशिरार्पयत छाननीचे काम सुरू होत़े