दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:38+5:302021-07-22T04:12:38+5:30
जळगाव - दीपस्तंभ फाउंडेशन संस्थेद्वारे (जळगाव व पुणे) मनोबल प्रकल्पाअंतर्गत दिव्यांग, अनाथ व आर्थिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना विविध ...

दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण
जळगाव - दीपस्तंभ फाउंडेशन संस्थेद्वारे (जळगाव व पुणे) मनोबल प्रकल्पाअंतर्गत दिव्यांग, अनाथ व आर्थिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी विनामूल्य निवासी प्रशिक्षण तसेच ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
२०२१ वर्षासाठी देशभरातून ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ३० जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. अंध,अस्थिव्यंग, कर्णबधिर विद्यार्थ्यांना तसेच अनाथ व आदिवासी, ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना यूपीएससी,एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँक, रेल्वे, एसएससी अश्या विविध स्पर्धा परीक्षांचे वर्षभर निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी किमान बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे निवड करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन यजुवेंद्र महाजन यांनी केले आहे.