चाळीसगावला शनिवारी ऑनलाइन कथाकथन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:21 IST2021-08-27T04:21:34+5:302021-08-27T04:21:34+5:30
चाळीसगाव : रंगगंध कलासक्त न्यासतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी कार्यशाळेचेही आयोजन केल्याची माहिती ...

चाळीसगावला शनिवारी ऑनलाइन कथाकथन कार्यशाळा
चाळीसगाव : रंगगंध कलासक्त न्यासतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी कार्यशाळेचेही आयोजन केल्याची माहिती रंगगंधचे अध्यक्ष व रंगकर्मी डॉ. मुकूंद करंबेळकर यांनी दिली.
१८ वर्षे वयावरील सर्व स्पर्धकांनी रहस्य कथा, भयकथा, विनोदी आणि मानवी नातेसंबंधांशी निगडित कथा या तीन प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारातले ८ ते १० मिनिटांचे कथाकथन करणे अपेक्षित आहे. यावेळी इच्छुक स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज गुगल फॉर्म स्वरूपात २८ पर्यंत पाठवणे अपेक्षित आहे. याच स्पर्धकांसाठी २८ रोजी शनिवारी सायंकाळी सात वाजता रंगकर्मी नरेश गुंड हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेनंतर स्पर्धकाने ८ ते १० सप्टेंबरदरम्यान आपला कथाकथनाचा व्हिडिओ मोबाइल आडवा धरून चित्रित करून स्पर्धेसाठी पाठवायचा आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
चौकट
प्रेक्षकांच्या प्रतिसादातून ठरविले जातील क्रमांक
स्पर्धकांच्या व्हिडिओतील नामांकन प्राप्त व्हिडिओज रंगगंधच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येतील. त्यांना मिळणाऱ्या व्हयूज, लाईक्स आणि कॉमेंट्सप्रमाणे प्रत्येक गटात प्रेक्षक पसंतीचे एक परितोषिक देण्यात येईल. २६ सप्टेंबर रोजी पारितोषिक वितरण केले जाईल.