कृषी सेवा केंद्रधारकांचे ऑनलाईन चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST2021-05-26T04:17:36+5:302021-05-26T04:17:36+5:30
मुक्ताईनगर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी मुक्ताईनगर व बोदवड यांच्यामार्फत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ...

कृषी सेवा केंद्रधारकांचे ऑनलाईन चर्चासत्र
मुक्ताईनगर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी मुक्ताईनगर व बोदवड यांच्यामार्फत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रधारकांचे खरीप हंगामपूर्व ऑनलाईन चर्चासत्र झाले.
यात तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी कृषी सेवा केंद्रधारकांशी कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण मार्गदर्शक सूचनांविषयी चर्चा केली.
कृषी सेवा केंद्रधारकांना येणाऱ्या अनेक अडचणी मांडण्यात आल्या. आमदार पाटील यांनी सर्व कृषी सेवा केंद्रधारकांशी खतपुरवठा व साठ्याबाबत चर्चा केली, तसेच शेतकऱ्यांना कृषी माल खरेदीसंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत दुकानदारांशी संवाद साधला.
चर्चासत्रात कृषी सेवा केंद्रधारक असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष विनोद तराळ, मुक्ताईनगर कृषी अधिकारी मोरे, बोदवड कृषी अधिकारी पंचायत समिती धांडे, मंडळ कृषी अधिकारी नितीन पगार, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रधारक उपस्थित होते.