भुसावळ विभागात ऑनलाईन पेन्शन अदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:36+5:302021-06-16T04:23:36+5:30
भुसावळ : विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसंदर्भात १५ रोजी मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात २०२१ मधील प्रथम ऑनलाईन पेन्शन ...

भुसावळ विभागात ऑनलाईन पेन्शन अदालत
भुसावळ : विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसंदर्भात १५ रोजी मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात २०२१ मधील प्रथम ऑनलाईन पेन्शन अदालत घेण्यात आली. यात एकूण ६५ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले. ज्यामध्ये सहा लाख ५९ हजार ७९३ रुपये रक्कम देण्यात आली.
पेन्शन अदालतचे मुख्य न्यायाधीश अपर मंडळ रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता, तसेच लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक कार्मिक अधिकारी वीरेंद्र वडनेरे यांनी केले. नाशिक पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. जी. कुलकर्णी यांनी पेन्शनधारक व प्रशासनाच्या समस्या निवारणासंबंधी सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले.
या कोरोना काळातही प्रशासनाने पेन्शनर्सचे तक्रारीचे निराकरण केले. प्रशासनाने याचे कौतुक केले. सहायक कार्मिक अधिकारी बी. एस. रामटेके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.