आर्बिटर प्रशिक्षण शिबिराचे ऑनलाईन उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST2021-05-24T04:15:57+5:302021-05-24T04:15:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना आयोजित महाराष्ट्र राज्यातील ...

आर्बिटर प्रशिक्षण शिबिराचे ऑनलाईन उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना आयोजित महाराष्ट्र राज्यातील आर्बिटरचे दुसऱ्या प्रशिक्षण शिबिराचे ऑनलाईन उद्घाटन २३ मे रविवार रोजी सकाळी नऊ वाजता झाले. संपूर्ण भारतातील आर्बिटर यांना आपले करियर बुध्दी बळात करायचे असल्याने सुरक्षा म्हणून त्यांना बुद्धिबळ महासंघाने मासिक स्वरूपात पेन्शनची योजना आखावी व त्यांना पेन्शन देण्यात यावी अशी मागणी, संघटनेचे खजिनदार फारूक शेख यांनी केली. यावेळी ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांची प्रमुख उपस्थिती होती
अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष वीपनेश भारद्वाज, खजिनदार नरेश शर्मा, मुंबईचे राहुल शाह, महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश चितळे यांनी यावेळी सहभाग घेतला. शिबिराचे सुत्रसंचलन महाराष्ट्राचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी केले तर आभार सचिव निरंजन गोडबोले यांनी मानले. या शिबिरात मंगेश गंभीरे, स्वप्निल बनसोडे, भरत चौगुले, विलास म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात २५ आर्बिटर सहभागी झाले होते.