शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला : ऑनलाईन शिक्षणापासून लाखांवर विद्यार्थी वंचित लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ...

कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला : ऑनलाईन शिक्षणापासून लाखांवर विद्यार्थी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोष‍ित झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका हा शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्‍ये ऑनलाईन शिक्षण पद्धत रूजली. परंतु, ग्रामीण भागात आजही अनेक विद्यार्थ्यांकडे साधे मोबाईल आहेत तर काहींकडे तेही नाहीत. ज्यांच्याकडे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना नेटवर्क मिळत नसल्याने परिसरात ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला बघायला मिळत आहे. परिणामी, अजूनही जळगाव जिल्ह्यातील लाखांच्यावर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.

कोरोना विषाणूचा मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने गतवर्षी मार्च महिन्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू केली आहे. परंतु, याचा फक्त शहरी भागातीलच विद्यार्थ्यांना लाभ मिळत असल्याचे चित्र काही दिवसातच समोर आले. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. ही मुलं वाड्या-वस्त्यावर राहात असल्याने अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ मिळाला नाही. या विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे, म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घरापर्यंत शिक्षण पोहोचवले. गुरूजींनी गावातील विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. सोबत आकाशवाणीद्वारे शिक्षण दिले.

ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाल्यापासून पहिली ते दहावीचे शिक्षक व संबंधित संस्था त्या संस्थेच्या संकेतस्थळावर किंवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मुलांसाठी अभ्यासक्रम टाकतात. हा अभ्यास शहरातील ठराविक मुलेच करतात व केलेला अभ्यास व्हॉट्सअ‍ॅपवर टाकतात. दरम्यान, नुकत्याच शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे पुन्हा बंद पडल्या अन् ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. पण, हवे तसे ऑनलाईन शिक्षण अजूनही विद्यार्थ्यांना म‍िळत नाही. जिल्हा परिषद, मनपा शाळेतील मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत.

परीक्षा मात्र सुरळीत

काही किरकोळ अडचणी वगळता ऑनलाईन परीक्षाही प्रभावी ठरली. शाळा, महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पडल्या. सुरूवातीला लॉग-इन होत नसल्याची तांत्रिक अडचण उद्भवली. नंतर परीक्षा सुरळीत पार पडल्या. मात्र, प्रत्यक्ष शाळा व परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे.