नाहाटा कॉलेजला रसायनशास्त्रावर ऑनलाइन परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST2021-06-24T04:13:21+5:302021-06-24T04:13:21+5:30
भुसावळ : येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषद झाली. ...

नाहाटा कॉलेजला रसायनशास्त्रावर ऑनलाइन परिषद
भुसावळ : येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषद झाली. परिषदेचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे ताप्ती एज्युकेशन सोसायटी संजयकुमार नाहाटा यांनी केले.
यावेळी प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, परिषदेचे चेअरमन डॉ. सचिन येवले प्रमुख उपस्थित होते. या परिषदेत रसायनशास्त्रातील सैद्धांतिक व गणकीय रसायनशास्त्र, रासायनिक अभिक्रिया, जैविक उत्पादकता, हरित रसायनशास्त्र, पर्यावरण रसायनशास्त्र, पॉलीमर रसायनशास्त्र इ. रसायनशास्त्रातील वेगवेगळ्या विषयांबद्दल मार्गदर्शन झाले.
परिषदेत संशोधक व विद्यार्थी मिळून देशभरातील १५५ संशोधक प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
प्रथम सत्रात प्रा. राजेंद्र झोपे (अमेरिका) यांनी डेन्सिटी फंक्शनल थेअरीमधील नवीन बदल तसेच त्यांच्या ग्रुपने शोधलेले एस.आय.सी.- डी.एफ.टी. या पद्धतीबद्दल माहिती दिली.
उपप्राचार्य डॉ. ए.डी. गोस्वामी, उपप्राचार्य डॉ. एन.ई. भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे चेअरमन डॉ. सचिन येवले, परिषदेचे समन्वयक डॉ. उमेश फेगडे, सचिव प्रा. चंद्रकांत सरोदे, उपसचिव डॉ. विलास महिरे, डॉ. जी.आर. वाणी, प्रा. डी.एन. पाटील, परिषद कोषाध्यक्ष प्रा. संगीता भिरूड, प्रा. नीलिमा पाटील, प्रा. तेजश्री झोपे, डॉ. सचिन कोलते, डॉ. अजय क्षीरसागर, प्रा. शंकर पाटील, प्रा. हर्षल पाटील यांनी परिश्रम घेतले, असे परिषद प्रसिद्धी समिती प्रमुख प्रा. प्रशांत पाटील यांनी कळविले आहे.