ऑनलाईन प्रवेशासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:28+5:302020-12-04T04:42:28+5:30

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता ऑनलाईन ...

Online admission deadline extended to December 15 | ऑनलाईन प्रवेशासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

ऑनलाईन प्रवेशासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत होती. आता १५ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्या एम.ए. मराठी, हिंदी, इंग्लिश, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सरंक्षण व सामरिकशास्त्र, एम.ए. शिक्षणशास्त्र, एम.कॉम. व एल.एल.एम अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत १५ डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. बऱ्याच विद्यापीठांचे विविध अभ्याक्रमांचे निकाल कोविड-१९ च्या महामारी मुळे जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना विभागात प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून सदरची मुदत वाढविण्यात आली असल्याचे बहि:स्थ शिक्षण अध्ययन विभागाचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी यांनी सांगितले.

Web Title: Online admission deadline extended to December 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.